पक्षाने खूप दिलं आता परत करण्याची वेळः सोनिया गांधी
पाच राज्याच्या पराभवावर आणि काँग्रेस च्या दयनीय अवस्थेवर सध्या काँग्रेस चं राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबीर सुरू आहे. या शिबिरात काँग्रेस चे 430 दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.
X
पाच राज्यात झालेल्या प्रचंड पिछेहाटीनंतर काँग्रेसने अखेर राजस्थानमध्ये चिंतन शिबीर आयोजित केले आहे. या चिंतन शिबीरात आधीच उष्ण असलेल्या राजस्थानमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पक्षातील कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
या चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.त्या म्हणाल्या, केंद्रात असलेले मोदी सरकार देशात भीती आणि ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहे. अल्पसंख्यक लोकांवर निशाणा साधला जात आहे. अल्पसंख्याक लोक आपल्या समाजाचा आणि लोकशाहीचा समान भाग आहेत, असं म्हणत देशातील सांप्रदायिक वातावरणावरून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
सोनिया गांधी यांनी यावेळी संघटनेमध्ये बदल करण्याच्या मागणीवर देखील भाष्य केलं. आपल्याला कामकाजात बदल करायला हवा. पक्ष संघटनेकडे आता व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पाहायला हवं. पार्टीने आपल्याला खूप काही दिलं आहे आता आपण पार्टीला देण्याची गरज आहे.
पाहा काय म्हणाल्या सोनिया गांधी