Home > Max Political > मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली संजय राऊत यांची अक्कल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली संजय राऊत यांची अक्कल

संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच आता एकनाथ शिंदे यांनीही थेट संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढली संजय राऊत यांची अक्कल
X

संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच आता एकनाथ शिंदे यांनीही थेट संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जात आहे. त्यातच अनेकदा संजय राऊत यांची जीभ घसरल्याचे पहायला मिळाले. त्यावर प्रतिक्रीया विचारली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडले.

होळीच्या निमीत्त महाराष्ट्राला शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी संजय राऊत यांच्यावर वक्तव्य करण्याचे टाळले. मात्र त्यानंतर पुन्हा विचारले असता संजय राऊत यांनी अक्कल बाळगावी, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराष्ट्रातील सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ देतो. या होळीत महाराष्ट्राचे सर्व दुःख जळून जाऊ दे, अशी इच्छा व्यक्त करतो, असंही वर्षा निवासस्थानी होळी साजरी करताना मुख्यमंत्री म्हणाले. (Holi festival)

होळीच्या काळात प्रज्वलित झालेला अग्नी राज्यातील वाईट विचारांना भस्मसात करेल आणि चांगल्या विचारांच्या सहवास घडवेल. तसेच राज्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्याचे नागरिक सुखी, समृद्ध आणि समाधानी असावेत, अशी माझी इच्छा आहे. "मला लोकांच्या जीवनात रंग आणायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र आनंद, संपत्ती आणि आनंदाच्या रंगात वावरतील अशी आम्ही मनापासून आशा करतो. धुळवडच्या स्मरणार्थ सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. मी येथील जनतेला आवाहन करतो की, महाराष्ट्राने होळी शाश्वतपणे साजरी करावी. रासायनिक रंगांचा वापर करू नये. त्याऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा. (Natural Colour) ही होळी जबाबदारीने साजरी करावी, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. "शेतकऱ्यांचे जिथे नुकसान झाले असेल तिथे सरकार त्यांना साथ देईल. सरकार शेतकऱ्यांना डावलणार नाही. शेतकरी आम्हाला अन्न पुरवतो. त्यामुळे त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde on unseasonal Rain)

Updated : 7 March 2023 7:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top