Home > Max Political > चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, शिवसेनेने केले आवाहन

चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, शिवसेनेने केले आवाहन

भाजप कोल्हापुर उत्तर विधानसभा निवडणूक हरल्यास मी हिमालयात जाईन, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वक्तव्याची आठवण करून देत निकालानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यावरून सामनाच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, शिवसेनेने केले आवाहन
X

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, चार राज्यांतील विधानसभा निवडणूकीत भाजपचा पराभव झाला आहे. या निकालाचा अर्थ विरोधकांना अभूतपुर्व यश मिळाले असा होत नाही. मात्र या निवडणूकीचा अर्थ इतकाच की भाजप आणि बगलबच्चे देशात धार्मिक द्वेषाचा विषाणू पसरवत असताना, निवडणूका जिंकण्यासाठी आणि लढण्यासाठी जातीय, धार्मिक हिंसेचे वातावरण पेटवत असताना चारही राज्यात मतदारांनी भाजपचा पराभव केला आहे, असा टोला भाजपला लगावला आहे.

कोल्हापुर उत्तर विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाला होता. त्या जागेवर निवडणूक पार पडली. या निवडणूकीत चंद्रकांत पाटील त्यांच्या होम पीचवर कुस्ती खेळतील अशी अपेक्षा होती. कारण चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, कोल्हापुरमध्ये एखादी पोटनिवडणूक लागली तर मी ती लढेन आणि जिंकून येईन. मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील गायब झाल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला.

या निवडणूकीत पराभव झाला तर मी राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असे वक्तव्य केले होते. ती संधी त्यांना कोल्हापुरच्या निवडणूकीच्या निकालानंतर मिळाली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच रहावे, असे आवाहन सामनातून करण्यात आले आहे.

चार राज्यातील पोटनिवडणूकीवरही केले भाष्य

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशातील चार राज्यातील पोटनिवडणूकीतही भाजपचा पराभव झाला. या पराभवाचा अर्थ विरोधकांनी अभुतपुर्व यश मिळवले असा होत नाही. मात्र या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपचे जे बगलबच्चे आहे. जे देशात द्वेषाचा विषाणू पसरवत आहे. त्याबरोबरच निवडणूका जिंकण्यासाठी आणि लढण्यासाठी जातीय, धार्मिक हिंसेचे वातावरण पेटवत आहेत. पोटनिवडणूकांसाठी मतदान सुरू असताना हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंगे, राम नवमीची मिरवणूक अशा कारणांवरून दंगलीची बीजं पेरली जात होती. मात्र तरीही पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणूका भाजप विरोधकांनी जिंकल्या, ही भाजपला चपराक आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

कोल्हापुरमध्ये मतदारांची दिशाभूल

कोल्हापुरमध्ये चंद्रकांत पाटील उभे राहिले असते तर जयश्री पाटील यांनी लाखाचा आकडाही पार केला असता. याचा अर्थ कोल्हापुरमध्ये भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केला नाही असा नाही. तर भाजपने मोठा फौजफाटा कामाला लावला होता. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. मतदारांना पैसे वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलेही. ही कोल्हापुरमधील मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Updated : 18 April 2022 9:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top