Home > Max Political > पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग कोसळला

पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग कोसळला

पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग कोसळला
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात रविवारी पुणे महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पण २४ तासांच्या आतच सोमवारी दुपारी या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही भाग कोसळून पडला. हा प्रकार उघड होताच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने या घटनेचा निषेध केला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख आणि काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी या घटनेबद्दल भाजपचा तीव्र निषेध केला असून या गोष्टीबद्दल कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ मोदींच्या हस्ते उद्घाटनासाठी घाई गडबडीत बसवला गेला, त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते झाले होते आणि त्यानंतर अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन देखील झाले.

या कार्यक्रमाला काही तास होत नाही तोवर क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेताना, मेघडांबरीचा काही भाग पडला आहे. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Updated : 7 March 2022 7:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top