Home > Max Political > ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
X

राज ठाकरेंवर ( Raj Thakare)ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.१२ एप्रिल रोजी ठाण्यात भव्य सभा झाली होती.भाषण करण्यापूर्वी सभेत राज ठाकरे यांनी तलवार ( sword) उंचावली होती.याप्रकरणामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातच राज ठाकरे यांच्या भाषणाचाही तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणीही गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी माहिती मिळत आहे.

उत्तरसभेपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला होता.यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलावर राज ठाकरे यांनी उंचावली.दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तलवार उंचावल्याने मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत अखेर मशीदीवरील भोंग्याविषयी इशारा दिला आहे. येणाऱ्या 3 तारखेआधी, म्हणजेच ईद आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. तसे न झाल्यास हनुमान चालिसा वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Updated : 13 April 2022 1:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top