महाविकास आघाडीवरील जनतेच्या रोषामुळे आम्हाला प्रचंड यश - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर इतकी संकटं आली पण कुणालाही मदत केली नाही. याचाच रोष जनतेने या निवडणुकीत व्यक्त केला आहे. म्हणूनच आम्हाला प्रचंड मोठ यश मिळाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादा यांच्या गावातील पराभवावर देवखील भाष्य केलं.
X
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळीकडे भाजपला प्रचंड विजय मिळालं आहे. कोरोनाच्या काळात मोदी सरकार सामान्य माणसाला, गरिबाला, शेतकऱ्याला, शेतमजुरांना मदत करत होत. याचं वेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारने शेतकऱ्यांवर इतकी संकटं आली पण कुणालाही मदत केली नाही. याचाच रोष जनतेने या निवडणुकीत व्यक्त केला आहे. म्हणूनच आम्हाला प्रचंड मोठ यश मिळालं आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणले.
चंद्रकांत दादा यांच्या गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले, एका गावात पराभव झाल्याने काही फरक पडत नाही चंद्रकांत दादांना इतकं टार्गेट केल्यानंतर देखील पश्चिम महाराष्ट्रात मात्र भाजपला चांगलं यश मिळालं आहे. या निवडणूकित शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिघे होते या तिघांनाही आम्ही पराभूत केले आहे.
शिवसेनेने पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेला बिहार मध्ये नोटा पेक्षाही कमी मत होती. त्यांनी बिहार मध्ये जे झालं ते लक्ष्यात घेतलं असतं आत तर अशी घोषणा केली नसती. नोटा पेक्ष्या कमी मत हा विक्रम पहिला आम आदमी पक्ष्यांच्या नावावर होगे तो आता शिवसेनेच्या नावावर झाला आहे. त्यामुळे प. बंगाल मध्ये पुन्हा कश्याला बेइज्जत करून घेता असा टोला त्यांनी लगावला.
धनंजय मुंडे प्रकरणात भाजपाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं.