Home > Max Political > भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचे आहेत - खा. सुप्रिया सुळे

भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचे आहेत - खा. सुप्रिया सुळे

भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचे आहेत - खा. सुप्रिया सुळे
X

"भाजप पक्षाचे एकच स्वप्न आहे, आणि ते म्हणजे शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवणे. जो कुणी भाजप पक्षाला वैचारिक विरोध करील त्याला संपवायचं आहे. त्यामुळे भाजप हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे देशाला घेऊन जात आहे. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने लोकसभा जिंकू", असा विश्वास राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या हिंजवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे हे विधान भाजप नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह सगळ्या देशाने ऐकलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायची भाषा वापरली, हे भाजपच्या पोटातील गोष्ट ओठावर आली आहे. हे भाजप नेत्यांचे आणि चंद्रकांत पाटील यांचं षडयंत्र असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

माने कुटूंब आणि फडणवीसांच्या भेटीमागचं गुढ

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर तालुक्यातील सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा असलेल्या माने कुटुंबियांनी भेट घेतली होती. या भेटीमागचं नेमकं कारण काय? हे अद्याप समजलं नाही. पण यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते फडणवीसांना लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे. इंदापुरचा भाग हा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे ही राजकीय लढत खूप महत्वपूर्ण होणार असल्याचं मानलं जात आहे.

Updated : 6 April 2024 2:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top