संजय राऊतच्या पत्रकार परिषदेवरुन भाजपच्या प्रतिक्रिया
X
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ईडी,भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली.संजय राऊतांनी त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले.याच पार्श्वभुमीवर आता भाजपकडुन प्रतिक्रिया येत आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातुन टिका केली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फार मोठे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गाजावाजा करणाऱ्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' असं झालं आहे. फक्त आरोप करून काही होत नाही, त्यासाठी पुरावेसुद्धा असावे लागतात, हे राऊतांना कळलं पाहिजे. असं ट्विट केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फार मोठे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गाजावाजा करणाऱ्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' असं झालं आहे. फक्त आरोप करून काही होत नाही, त्यासाठी पुरावेसुद्धा असावे लागतात, हे राऊतांना कळलं पाहिजे. pic.twitter.com/PUpdBJ2nKc
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 15, 2022
प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटवर एक फोटो पोस्ट केला आहे.वाघाचा फोटो पोस्ट करुन शुन्यावर आऊट असे कॅप्शन दिले आहे.
0 पे आऊट❗😂 pic.twitter.com/SN8I0y30cy
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 15, 2022
विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदतला एक व्हिडीओ शेअर केला आहे.त्यात संजय राऊत घाम पुसताना दिसत आहेत.भुंकतोय जोमानं आणि भिजलायं घामानं असे कॅप्शन देऊन टिका केली आहे.
भुंकतोय जोमानं,
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) February 15, 2022
अन् भिजलाय घामानं... pic.twitter.com/CX8QEjDp8v
दरम्यान, याआधी भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील, असं म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, उद्यापासून तुम्हाला कळेल. कोण अर्धा आहे, कोण पाव आहे, कोण चाराणेवाला आहे. हे जसजसे अटक होतील, तसतसे तुम्हाला समजतील.असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.