Home > Max Political > पदवीधर निवडणूक : भाजपमधील बंडखोरीबाबत मेटेंचा रोख पंकजा मुंडेंकडे

पदवीधर निवडणूक : भाजपमधील बंडखोरीबाबत मेटेंचा रोख पंकजा मुंडेंकडे

कोरोना काळात होऊ घातलेल्या विधानपरीषद निवडणुकीचे वातावरण तापत असताना आता पक्षीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीजेपीचे नेतेच बीजेपीची मारायला बसलेत असं विधान करत बिजेपीचा उमेदवार निवडून येऊ नये,असा प्रयत्न बीडचे बीजेपीचेच नेते करत आहेत असा आरोप थेट माजी मंत्री पंकजा मुंडेवर केला आहे.

पदवीधर निवडणूक : भाजपमधील बंडखोरीबाबत मेटेंचा रोख पंकजा मुंडेंकडे
X

गेली काही दिवस पंकजा मुंडे भाजप नेतृत्तावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय कार्यकारीनीत जबाबदारी दिली असली तर पंकजा मुंडे सातत्यांने भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर टिका करत आहे. बीडमधे शेतकरी बियाणे वाटप कार्यक्रमावेळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीजेपीचे नेतेच बीजेपी ची मारायला बसलेत असं विधान केलं.

तसेच बिजेपीचा उमेदवार निवडून येऊ नये, असा प्रयत्न बीडचे बीजेपीचेच नेते करत आहेत.आता बीडचा अपक्ष उमेदवार कोण आहे ? त्याला कोणी उभं केलंय हे तुम्हाला माहित आहे.असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष रित्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधला आहे. आता या आरोपावर पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Updated : 19 Nov 2020 7:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top