भाजप आमदाराचं कालीचरण ला समर्थन
X
शिवजयंती दिवशी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कालीचरण याच्याविरोधात पुणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता शिवजंयती दिवशी भडकाऊ भाषण केल्याने पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कालीचरण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. असं असताना भाजपच्या आमदाराने कालीचरण यांच्या वक्तल्याचं समर्थन केलंय. त्यांना पाठिंबा दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना कालीचरण महाराजाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी कालीचरण याला आपलं समर्थन असल्याचं म्हटलंय.
कालीचरण यांच्यासोबत असंख्यवेळी मी व्यासपीठावर राहिलेलो आहे. कालीचरण महाराज म्हणजे हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि हिंदुत्वाबाबत परखड मत कालीचरण महाराज मांडत आलेले आहेत. गुन्हा दाखल झाला असेल तर पोलिसांनी चौकशी करावी. पण कालीचरण महाराज यांचे विचार हिंदुत्वासाठी पोषक आहेत. हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांच्या विचारांमध्ये काहीही चुकीचं नाही. त्यांच्या विचारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.