Home > Max Political > आमदारांच्या निलंबनाविरोधात गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर

आमदारांच्या निलंबनाविरोधात गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर

आमदारांच्या निलंबनाविरोधात गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर
X

विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने राज्यभरात आंदोलन सुरू केल आहे. निलंबित झलेल्या 12 आमदारांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. भाजपने राज्यभर आंदोलन केलं असल तरी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर मध्ये काढलेला मोर्चा चर्चेत आहे. साधना महाजन ह्या जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत.

ह्या मोर्चात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. मुख्य चौकात रास्ता रोको ही काही काळ करण्यात आला. नियमबाह्यस पद्धतीने केलेले निलंबन मागे घेतले जावे अशी मागणी साधना महाजन यांनी केली. विधानसभा अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर चुकीची कार्यवाही केली, ही कारवाई त्वरित मागे घ्यावी नाहीतर तीव्र आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा साधना महाजन यांनी दिला. दरम्यान मोर्चाच्या वेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते.

Updated : 6 July 2021 3:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top