Home > Max Political > 19 बंगल्याप्रकरणी सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

19 बंगल्याप्रकरणी सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

19 बंगल्याप्रकरणी सोमय्या राज्यपालांच्या भेटीला
X

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र त्याठिकाणी बंगले आढळले नाहीत. परंतू रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला लिहीलेले पत्र वाचून दाखवत मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरोपांच्या गदारोळानंतरही यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोर्लई गावातील असलेले १९ बंगल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भातच किरीट सोमय्यांनी राज्यपाल भगत कोश्यारींची भेट घेतली आहे.

राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत. तरीही मुख्यमंत्री जनतेला उत्तर देत नाहीत. म्हणून या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या सहभागाची शंका वाढत आहे. त्यामुळे त्यांना जनतेला उत्तर द्यावेच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोमय्या यांनी आज कोर्लई येथील १९ बंगल्यांवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यात जे काही घोटाळे घडले आहेत किंवा घडत आहेत त्याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. कोर्लईतील १९ बंगल्यांच्या बाबत जर नेमकी माहिती समोर येत नसेल आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटूंबियांचे नाव त्यात आले असेल. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत त्यामुळे त्यांनी राज्यातील जनतेला उत्तर द्यायला हवे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागद दाखविला नाही. त्यानंतर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणले त्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले की किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत, असं सोमय्या म्हणाले आहेत.

Updated : 23 Feb 2022 3:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top