Home > Max Political > शरद पवार : अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न
शरद पवार : अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 April 2022 4:02 PM IST
X
X
शालेय अभ्यासक्रामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने संम्मेलन आयोजित केले होते. या संमेलनात बोलताना शरद पवार यांनी हा आरोप केला आहे. भाजपकडून शैक्षणिक अभ्यासक्रमात भगवद गीतेचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे.
त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून देशातील सामाजिक वातावरण खराब केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता शालेय अभ्यासक्रामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरलं जात असल्याचा आरोप केला आहे.
Updated : 1 April 2022 4:02 PM IST
Tags: sharad pawar NCP bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire