Home > Max Political > केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, भाजपकडून आऱोपींचा सत्कार

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, भाजपकडून आऱोपींचा सत्कार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या प्रकरणातील आरोपींचा भाजपकडून सत्कार करण्यात आला आहे.

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, भाजपकडून आऱोपींचा सत्कार
X

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या प्रकरणातील आरोपींचा भाजपकडून सत्कार करण्यात आला आहे.

आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीपाठोपाठ पंजाबचे मैदान मारले. तर केजरीवाल यांनी पुढील लक्ष गुजरात विधानसभा निवडणूक हे ठेवले आहे. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्स आणि भाजप कार्यकर्त्यांवर विधान केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या तर या हल्लाप्रकरणातील आरोपींचा भाजपचे राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांनी सत्कार केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्सवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मात्र त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. तर न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. याप्रकरणी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दिल्ली भाजपचे राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांनी भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला.

भाजप दिल्ली राज्य प्रमुख आदेश गुप्ता यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, हिंदूविरोधी केजरीवाल यांच्याविरोधात निदर्शने करताना जेलमध्ये गेलेल्या भाजप युवा मोर्चाच्या 8 कार्यकर्त्यांना 14 दिवसानंतर कोर्टाने जामीन दिला आहे. त्यामुळे या क्रांतीकारकांचे भाजप प्रदेश कार्यालयात स्वागत केले, असे मत आदेश गुप्ता यांनी व्यक्त केले. तसेच आमचा प्रत्येक कार्यकर्ता हिंदू विरोधी शक्तींविरोधात कायम लढा देत राहिल, असे ट्वीट केले आहे.

भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याप्रकरणातील आरोपींचा सत्कार केल्यानंतर त्यावर आम आदमी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आपच्या आमदार अतिषी यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच हा सत्कार म्हणजे कायदा हातात घेणारांचा हा सन्मान करण्याचा प्रकार असल्याचे मत अतिषी यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 16 April 2022 9:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top