मोदींचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास, फडणवीसांवर मोठी जबाबदारी...
X
केंद्रीय नेतृत्वाने आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. बिहार निवडणूकीचा प्रभारी म्हणून फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपला मोठं यश मिळवून दिलं होतं. त्यानंतर आता फडणवीस यांच्याकडे गोव्याचे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
देशात पुढील वर्षी पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील प्रभारींची नेमणूक केंद्रीय नेतृत्वाने केली आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान आणि गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. प्रह्लाद जोशी यांच्याकडे उत्तराखंड ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंजाबसाठी पंजाब केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासोबतच हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर मणिपुरची भूपेन्द्र यादव यांना जबाबदारी दिली आहे.
2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 5 राज्यांच्या निवडणूका भाजप सह विरोधी पक्षांना महत्त्वाच्या आहेत. त्यातच या पाच राज्याच्या निवडणूकांचा निकाल मोदी सरकारच्या 2024 चा मार्ग सांगणाऱ्या ठरतील. त्यामुळं मोदी सरकारने आत्तापासूनच आपल्या तयारीला सुरुवात केली असल्याचं दिसून येतंय.
ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.