औरंगाबाद: ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून रास्ता रोको
X
औरंगाबाद: ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर औरंगाबादच्या जालना रोडवरील आकाशवाणी चौकात सुद्धा भाजपकडून रास्ता रोको करण्यात आला.
न्यायालयाने राजकीय ओबीस आरक्षण रद्द केल्याने, याला राज्य सरकार जवाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. ठाकरे सरकारने न्यायालयात व्यवस्थित भूमिका मांडली नाही. त्यामुळेच आरक्षण कोर्टात टिकू शकलं नाही, असा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी यावेळी केला.
कर्नाटक सरकारप्रमाणे ओबीसी जनगणना करून त्याचा डेटा तयार करावा,तसेच मागास आयोगामार्फत ओबीसी मागास असल्याचं अहवाल जाहीर करण्याची मागणी सुद्धा यावेळी आंदोलकांनी केली.
पोलोसांचा मोठा बंदोबस्त
भाजपच्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आकाशवाणी चौकात दोन्ही बाजूने पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः लक्ष ठेवून होते.