Home > Max Political > नाशिकमधून ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकमधून ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकमधून ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर
X

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला राम-राम ठोकत माजी मंत्री बबनराव घोलप हे आज शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पक्षप्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे घोलप यांचा हा पक्षप्रवेश झाला तर हे चित्र उध्दव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का देणारं ठरणार आहे.

यापूर्वी बबनराव यांनी शिंदेसह भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती -

मुंबईतील वर्षा बंगल्यावर माजी मंत्री बबनराव घोलप यांचा आज सायंकाळी चार वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून शिर्डीच्या उमेदवारीवरून त्यांना डावलल्याने ते ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. बबनराव घोलप हे भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वर्तविण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट बबनराव घोलप यांनी घेतली होती.

पाच वेळा राहिले आहेत आमदार -

नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघातून १९९० ते २०१४ या कार्यकाळात बबनराव घोलप हे तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता शिर्डीमधून निवडणूक लढण्याची त्यांची ईच्छा असताना देखील ठाकरे गटाकडून त्यांना डावलण्यात आल्यामुळे ते शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Updated : 6 April 2024 1:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top