भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान; लाखोंच्या संख्येने सरकारला हरकती पाठवाव्यात
X
मराठा समाजाच्या आरक्षणात मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जो आद्यादेश काढलेला आहे तो आद्यादेश नसुन ती केवळ एक अधिसूचना आहे असं वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते छगन भूजबळ यांनी केलं आहे. 16 फेब्रुवारी पर्यंत सरकारकडून यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. राज्यातील राजकीय अभ्यासक, विचारवंत, वकीलांनी याचा अभ्यास करुन लाखोंच्या संख्येने हरकती पाठवल्या पाहीजे. यामूळे सरकारच्या लक्षात येईल की, याची दुसरीही बाजू आहे. सगेसोयरे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसु शकणारं नाही. दबाव आणून, झुंडशाहीच्या जोरावर आरक्षण मिळवता येत नाही, असं वक्तव्य राज्यसरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
या आद्यादेशाचा अर्थ स्पष्ट करताना भुजबळ असे म्हणाले की, आम्ही जिंकलो असं मराठा समाजाला वाटतंय. या १७ टक्क्यांमध्ये जवळपास ८५ टक्के येत असून ते सर्व एकाच ठिकाणी येतील. ईडब्ल्यूएसमध्ये जे १० टक्के मिळत होते, ते यापुढे आता मिळणार नाही. खुल्या प्रवर्गात जे उरलेले ४० टक्के होते त्यात जे मिळत होते ते आता मिळणार नाही. आता तुम्ही ज्या ५० टक्क्यांमध्ये खेळत होता. तिथे दुसरे कुणीच नाही, जवळपास ७४ टक्के समाज नाही. ती संधी गमाली आहे. आडीज ते तीन टक्के ब्राम्हण समाज होता या सगळ्यावर पाणी सोडावं लागेल. तुम्हाला १७ टक्क्यांत जावं लागेल. आणि ओबीसी व इतर जातीसोबत जागा मिळवण्यासाठी झगडावे. असं भुजबळ म्हणाले.
जन्माने येणारी ही जात असते, ती एखाद्याच्या शपथपत्राने येऊ शकते का ? जात ही मुळात जन्माने माणसाला मिळते म्हणून जर कुणी १०० रुपयांचे पत्र देऊ आणि जात घेऊ तर असे होऊ शकणार नाही. मग असे नियम जर सगळ्यांनाच लावायते झाले तर दलित, आदिवासी या प्रवर्गाचं काय होणार? सध्या जे काही तुम्ही वाचले आहे त्यात एससी, एसटी आणि ओबीसी या सर्वांना ते लागू आहे, मग मला या समाजाच्या नेत्यांना विचारायचे आहे की, यापुढे काय होणार आहे.मराठ्यांना फसवलं जातेय की, ओबीसींवर अन्याय केला जातोय याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आरक्षण लढ्यातील गून्हे मागे घ्या म्हणताय. ज्यांनी घरेदारे जाळली, पोलीसांना मारले त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत का? मग उद्या कुठीही उठेल आणि गुन्हे मागे घेण्यास सांगेल. फक्त मराठा समाजालाच १०० टक्के शिक्षण मोफत का ? सर्व ओबीसी, आदिवासी, आणि ब्राम्हण यांचं काय ? असा सवाल भुजबळांनी केला आहे.