लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर- शरद पवार
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे निकाल लागले आणि राज्यातील महाविकास आघाडीमध्ये चैतन्य पसरल्याचे पाहायला मिळू लागले आहे. कसबा पोटनिवडणूकीत आघाडीचा उमेदवारा विजयी झाला आणि इथे गेल्या ३० वर्षापासून असलेली भाजपची सत्ता उलधवून लावण्याचे काम आघाडीने केले. या विजयावर प्रतिक्रीया देताना शरद पवार यांनी सांगितले की, देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आणि २०२४ मध्ये देशातील नेतृत्वामध्ये बदल झालेला पाहायला मिळेल.
X
कसबा ( KASABA) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (BY ELECTION) भाजपला (BJP) केवळ चिंचवडचा गड राखता आला. मात्र गेल्या ३० वर्षापासून भाजपकडे असलेला कसबा मतदारसंघाचा गड महाविकास आघाडीने जिंकला. या विजयानंतर राजकीय वर्तुळात आजही प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी भाजपावर निशाणा जाधला आहे. आणि देश बदल रहा है असे सांगितले. कसबा पोट निवडणूकीत धंगेकर यांना दोन ठिकाणी जास्त मिळाली असल्याचे पवार यांनी सांगत हा बदल पुण्यात झाला आहे, तो लवकरच देशातही होणार असल्याचे सांगितले. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आले असल्याचे पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या. त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल झाला पाहिजे. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत, पंतप्रधान आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचाही यात समावेश व्हावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. पदवीधर निवडणुकामध्ये जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नसल्याचे पवारांनी सांगितले. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, शरद पवार (SHARAD PAWAR) म्हणाले. तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये २ क्रमांकाची मते घेणार पक्ष राष्ट्रवादी ठरला होता. याबाबत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले.