बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी - उध्दव ठाकरे
X
मुंबईत आज सकाळी भाजपने कार्यकर्ता मेळावा षण्मुखानंद सभागृहात घेतला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली मुंबई घडवाय़ची असल्याचे म्हणत उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली असल्याचे म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला . त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले , मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे . भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार , या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला . महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला .