Home > Max Political > पंतप्रधान मोदींकडून ‘लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर’ ची घोषणा

पंतप्रधान मोदींकडून ‘लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर’ ची घोषणा

पंतप्रधान मोदींकडून ‘लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर’ ची घोषणा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Naredrd Modi) यांनी आपल्या एक्स(X Handle) अकऊंटवरुन नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये दिर्घकाळ कार्यरत असलेले, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी(Lalkrushna Advani) यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिताना असं म्हटलंय की,”मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, लालकृष्ण आडवाणी यांना देशातला सगळ्यात मोठा पुरस्कार अर्थात भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, मी त्यांच्याशी संवाद साधला असून या सन्मानाने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.”

आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित आणि अभ्यासू नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. अगदी स्थनिक स्तरावरुन त्यांनी त्यांच्या कार्याची सुरूवात केली ते देशाच्या उपपंतप्रधान पदी विराजमान होईपर्यंत त्यांनी खऱ्या अर्थाने देशसेवा केली हे विशेष उल्लेखणीय बाब आहे. गृहमंत्री आणि सूचना आणि प्रसारण मंत्री रुपानेही त्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांचा संसदेतील सहभाग नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहे, असंही मोदी म्हणाले

Updated : 3 Feb 2024 2:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top