Home > Max Political > 'सावधान, अमित शहा येतायेत': दरवाजे खिडक्या बंद करा..!

'सावधान, अमित शहा येतायेत': दरवाजे खिडक्या बंद करा..!

सावधान, अमित शहा येतायेत: दरवाजे खिडक्या बंद करा..!
X

व्हीआयपींच्या दौरे सर्वसामान्यांना नवीन नाहीत.. परंतु अहमदाबाद इथल्या वेजलपूर भागातल्या उंचच उंच इमारतींमध्ये राहणारे रहिवासी स्थानिक पोलिसांच्या आदेशाने चक्रावून गेले आहे. केंद्रीय विस्तारात अतिरिक्त सहकार विभागाची जबाबदारी मिळालेले गृहमंत्री अमित शहा त्यांच्या दौऱ्यामुळे पोलिस आदेशानुसार घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तीनदिवसीय अहमदाबाद भेटीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे.अमित शाह शनिवारीच अहमदाबादला पोहोचले आहेत. भेटीदरम्यान ते शहरातल्या अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत.यामध्ये वेजलपूर इथल्या सामूहिक भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचादेखील समावेश आहे.

याच सामुदायिक भवनाच्या परिसरात असणाऱ्या उंच सोसायट्यांच्या चेअरमनना स्थानिक पोलिसांनी 9 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, 11 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान आपापल्या घरांचे दरवाजे खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन दरवाजे-खिडक्या बंद करण्याचं आवाहन केलं.

लोकांनी आदेशाचं पालन केलं नाही तसं त्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला.गृहमंत्री वेजलपूर इथल्या सामुदायिक भवनाचं उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना करण्यात आली असून लोकांना विनम्रतेनं आवाहन केलं जात आहे.

अमित शहा यांचा दौरा आणि सुरक्षेच्या हेतूने

सामुदायिक भवनाच्या परिसरातील इमारतींना मुख्य दरवाजे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत."हे सुरक्षेच्या कारणास्तव केलं जात आहे. या परिसरात अनेक उंच इमारती आहेत. अशा परिस्थितीत एकाचवेळी सगळीकडे बंदोबस्त ठेवणं पोलिसांना शक्य होणार नाही. लोकांनी यासाठी मदत केली, दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या, कार्यक्रम झाल्यानंतर उघडल्या तर पोलिसांना सोयीचं ठरेल."

देशाच्या गृहमंत्र्यांसाठी झेड प्लस सुरक्षायंत्रणा आहे. देशातली ही अतिशय ताकदवान सुरक्षा यंत्रणा मानली जाते. झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी 36 सुरक्षा रक्षकांचा ताफा सज्ज असतो. या ताफ्यात नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडोंचा समावेश असतो.

पहिल्या तुकडीत नॅशनल सेक्युरिटीचे कमांडो असतात तर दुसऱ्यामध्ये एसपीजी कमांडो असतात.याव्यतिरिक्त आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही असतात. गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः अहमदाबाद येथील लोकसभा मतदारसंघातून नेतृत्व केले असून मोदी सरकारच्या दुसरा कालखंडामध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून कामकाज पाहता हे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना अतिरिक्त सहकार मंत्रालयाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

Updated : 11 July 2021 7:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top