श्रीकांत शिंदे यांच्या नावाने चालणाऱ्या फाउंडेशनवर संजय राऊतांचा आरोप...!
X
श्रीकांत शिंदे फाउंडेशच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य गरिब कुटूंबांना, होतकरू व्यक्तींना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक कार्यासाठी संस्था, संघटना यांना सहकार्य करण्याचे काम केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक स्त्रोत संशयास्पद असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे, यासंदर्भात त्यांनी या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची देखील राऊत यांनी मागणी केली आहे.
जिल्हा धर्मदाय आयुक्तांकडून या संस्थेची माहिती दिली जात नाही
श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती कुठेही प्रसिध्द केली जात नाही. जिल्हा धर्मदाय आयुक्तांकडे या फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु एक महिना झाल्यानंतरही याची साधी दखल सुध्दा धर्मदाय आयुक्तांनी घेतली नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रसिध्द वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वारंवार माहिती मागितली असूनही याविषयी माहिती दिली जात नाही.
श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत असून ते या संस्थेचे प्रमुख आहेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मोठ-मोठे उपक्रम राबवले जातात. लाखो रुपयांची मदत केली जाते. मात्र यासाठी फाउंडेशनकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतो कुठून? याची कसलीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाज यांच्या नावाखाली पांढरा करण्याचा उद्योग या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. शिवाय, याविषयी चौकशी करण्याचीही मागणी राऊत यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.