देशातील नरेंद्र मोदींच्या सर्व जाहिराती त्वरीत काढून टाकाव्या - असीम सरोदे
X
नरेंद्र मोदींच्या भारतातील सर्व जाहिराती त्वरित काढाव्यात किंवा या जाहिरातींवर काळा रंग लावून त्या अस्तित्वहीन कराव्या अशा पध्दतीची कायदेशीर नोटीस ॲड.असीम सरोदे, डॉ विश्वमभर चौधरी, ॲड. श्रीया आवले, ॲड.बाळकृष्ण निढाळकर, ॲड. रमेश तारू,ॲड. सुमित शिवांगी, ॲड. संदीप लोखंडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयुक्त यांना दिनांक 14 मार्च 2024 रोजी पाठविली आहे.
सगळ्या सरकारी व निमसरकारी कार्यलयांमध्ये, रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्टस, बस स्टॉपस, सगळे राष्ट्रीय व राज्य महामार्ग रस्ते,बंदरे, पेट्रोल पम्प्स, दवाखाने, जंगले, सरकारी विश्रामगृहे, सार्वजनिक स्वच्छता गृहे, सार्वजनिक संडास, बसेस, पोलीस स्टेशन्स, सगळी न्यायालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे येथून नरेंद्र मोदी व भारतातील सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे, जाहिराती त्वरित हटविण्यात याव्यात अशी मागणी नोटिसमधून करण्यात आलेली आहे.
जनतेच्या करातून गोळा झालेले करोडो रुपये नरेंद्र मोदींनी स्वतःची प्रतिमा जाहिरातीतून प्रकाशित करण्यासाठी खर्च केले व त्या अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातबाजीचा नागरिकांना उबग आलेला आहे निदान निवडणूक काळात तरी भारत देश नरेंद्र मोदींच्या प्रतिमा रंजनापासून मुक्त असेल अशी अपेक्षा यावेळी ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.