Home > Max Political > "पाहुणे गेल्यानंतर मी बोलणार"..आयकर धाडींनंतर अजित पवारांचे सूचक वक्तव्य

"पाहुणे गेल्यानंतर मी बोलणार"..आयकर धाडींनंतर अजित पवारांचे सूचक वक्तव्य

पाहुणे गेल्यानंतर मी बोलणार..आयकर धाडींनंतर अजित पवारांचे सूचक वक्तव्य
X

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या कारखान्यांवर, कार्यालयांवर आणि घरांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. शुक्रवारपासून ही कारवाई सुरू आहे. यात जरंडेश्वर कारखान्याचे संचालक, अजित पवार यांच्या दोन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयाचा समावेश आहे. काही लोक केवळ आपले नातेवाईक आहेत म्हणून कारवाई केली जात आहे, अशी टीका अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा अजित पवार यांनी याबाबत पत्रकारांनी विचारले तेव्हा "आयटीवाले त्यांचं काम करत आहेत. ते जिथे जिथे गेले तिथे ते आजही आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर बोलून मला त्यांच्या चौकशीत व्यत्यय आणायचा नाही. पाहुणे लोक तिथे थांबले आहेत. ते त्यांचं काम करून गेल्यानंतर मी बोलणार, मी कुठे पळून जाणार नाही. मी नियमित टॅक्स भरतो. मी आर्थिक शिस्त पाळतो आणि पाळायला लावतो." असे अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान लखीमपुरच्या घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी छापे घातले जातात, असं कोणी म्हणत आहे. पण कुणाला काय म्हणायचे ते म्हणू देत पण आम्ही येत्या 11 तारखेला महाविकास आघाडी म्हणून लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहोत, त्यात माघार घेणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Updated : 8 Oct 2021 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top