अजित पवार यांचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी काय संबंध आहे?
X
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडी ने कारवाई केली आहे. सदर कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा असून, घाडगे हे अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यानं बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आलं आहे. त्या आधारेच ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे.
काय आहेत आरोप?
जरंडेश्वर कारखान्यानं बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आलं आहे. त्या आधारेच ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरूपाचा होता. मात्र, नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. हा कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांचा असल्याने अजित पवार यांनी आज माध्यमांशी या संदर्भात पुण्यात संवाद साधला.
'जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईविरोधात न्यायालयात आव्हान देईल,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
संचालक मंडळानं हा कारखाना विकलेला नाही. कोर्टानं विक्रीला काढलेला कारखाना कोणी बळकावू शकतं का?,' असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी माजी आमदार शालिनीताई पाटील यांच्या आरोपांबाबत बोलताना केला.
कर्ज थकवणाऱ्या कारखान्यांना विक्रीत काढण्याचा निर्णय कोर्टाचा होता. त्या मध्ये कोणी फेर फार करूच शकत नाही.
घोटाळा नेमका काय आहे ते सांगावं?
जरंडेश्वर साखर कारखान्याची किंमत इतर कारखाण्यांपेक्षा अधिक महाग विकलेली आहे. कारखाना खरेदीसाठी 15 ते 16 टेंडर आलेले होते. त्यामध्ये गुरू कमोडिटीनं सर्वात जास्त बोली लावली होती. माझ्या माहितीनुसार, हा कारखाना सर्वाधिक किंमतीला विकला गेला होता. याउलट राज्यातील इतर कारखाने खूप कमी किंमतीला विकले गेले आहेत. मराठवाड्यातील एका कारखान्याची क्षमता जरंडेश्वर कारखान्याइतकी असतानाही तो कारखाना अवघ्या चार कोटींमध्ये विकला गेला. शिवाय, कारखाना विकत घेणारे सर्व पक्षांचे लोक आहेत. काही खासगी व्यक्तीही आहेत. त्यामुळं विक्रीमध्ये घोटाळा झाला असं कोणी म्हणत असेल तर तो घोटाळा नेमका काय आहे हे सांगावं,' असं आव्हान अजित पवारांनी दिलं.
तपास यंत्रणांना चौकशी करत असतात तसे त्यांना अधिकार आहेत. पण चौकशी करत असताना पारदर्शकता असायला हवी. त्यामागे कुठलाही वेगळा हेतू नसावा सर्व उघड असावे. पण देशात सध्या काय पद्धतीचं राजकारण चाललंय हे सर्वांनाच माहीत आहे,' असं इशारा देणार वक्तव्यही अजित पवार यांनी केलं. व गेल्या सरकारच्या काळातही सीआयडीने चौकशी केलेली होती. एसीबीनं चौकशी केली होती. काहीही निष्पन्न झालं नाही. ईडीनं आता कोणत्या आधारे चौकशी सुरू केलीय माहीत नाही. त्याबाबत कारखान्याचं व्यवस्थापन न्यायालयात जाईल,' असं अजित पवार म्हणाले.