सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा बिश्नोई-विश्नोई गँग संपवून टाकू असा इशारा...!
X
१४ एप्रिलच्या रात्री बिश्नोई गँगच्या दोन युवकांनी सलमानखानच्या घरावर गोळीबार केला. त्यानंतर त्या गुन्हेगारांना गुजरातमधल्या भूज येथून पोलीसांनी ताब्यात घेतले. आता यावर राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, मुंबईतील अंडरवर्ल्ड गँग अगोदरच संपलेली आहे. महाराष्ट्रात, मुंबईत कोणाचीही दादागिरी चालणार नाही. बिश्नोई-विश्नोई गँगला संपवून टाकू, असा थेट धमकी वजा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
बॉलीवूड अभिनेता सलमानखानची त्याच्या घरी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर शिंदे यांनी सलमानची भेट घेत कुटुंबियांना दिला, आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं ठणकाऊन सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, सलमानच्या घरावर दोन दिवसांपूर्वीच जो गोळीबार झाला त्यातील आरोपी विकी गुप्ता, सागर पोल या दोघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल. मूळापर्यंत चौकशी केली जाईल, अशा प्रकारच्या सूचना पोलिस आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ यावेळी बोलताना म्हणाले.