Home > Max Political > राहुल गांधी पाठोपाठ आता मोदींची खासदारकी अडचणीत ?

राहुल गांधी पाठोपाठ आता मोदींची खासदारकी अडचणीत ?

काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांच्यावर अपमानजनक टीका केली. चौधरी यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि कॅप्शनमध्ये असं लिहिलं कि, “बघुया, आता न्यायालय किती तातडीने कारवाई करतंय…!”

राहुल गांधी पाठोपाठ आता मोदींची खासदारकी अडचणीत ?
X

काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांच्यावर अपमानजनक टीका केली. चौधरी यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि कॅप्शनमध्ये असं लिहिलं कि, “बघुया, आता न्यायालय किती तातडीने कारवाई करतंय…!”

2018 मधला व्हिडिओ चौधरी यांनी शेअर केला आहे. मोदी राज्यसभेच्या अध्यक्षांना संदेश देत होते की, “रेणुकाजींना काही करू नका… रामायण मालिकेनंतर असं हास्य ऐकण्याचं सौभाग्य आज लाभलं आहे.” या संदर्भ रामायण मालिकेतील शूर्पणखेशी केला होता. राक्षस रावणाची बहीण असा उल्लेख आहे. रेणुका चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी तिची तुलना शूर्पंखेशी केली.

त्यावेळी मोदींच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मोदींनी या कमेंटसाठी माफी मागावी काँग्रेसने तेव्हा अशी मागणी केली होती. पाच वर्षांनंतर, रेणुकाने मानहानीचा खटला दाखल करण्याचा दावा. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना वापरलेल्या एका वाक्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. सुरत कोर्टाने मानहानीप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवलं असून त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

“मोदी शूर्पणखा म्हटलेचं नाही”.

रेणुका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भरभरून कंमन्ट्स येऊ लागल्या. अनेक लोकांचा दावा आहे की मोदींनी यात "शूर्पणखा" अश्या शब्दाचा प्रयोग केला नाही. याव्यतिरिक्त, काहींनी असे ठामपणे सांगितले आहे की संसदेत बोललेल्या वाक्यासाठी कोणीही न्यायालयात याचिका करू शकत नाही.

Updated : 24 March 2023 1:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top