Home > Max Political > #Shrilanka महागाईत होरपळलेल्या जनतेनं माजी पंतप्रधानांसह नेत्यांची घरं पेटवली

#Shrilanka महागाईत होरपळलेल्या जनतेनं माजी पंतप्रधानांसह नेत्यांची घरं पेटवली

श्रीलंकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या खासदाराचा आंदोलकांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. तर, 150 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळं श्रींलकेत अंतर्गत गृहयुद्ध सदृश्य परीस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

#Shrilanka महागाईत होरपळलेल्या जनतेनं माजी पंतप्रधानांसह नेत्यांची घरं पेटवली
X

महागाईनं होरपळल्यानंतर आर्थिक संकट आणि राजकीय अस्थैर्यामुळे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदूा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर महिंदूा यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर केलेल्या हल्ल्यानंतर हिंसाचार उसळल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. या हिंसाचारात सत्ताधारी खासदाराचा मृत्यू झाला असून, जवळपास १३० जण जखमी झाले आहे. यामुळे देशभर कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अध्यक्ष गोताबया आणि पंतप्रधान महिंदूा राजपक्षे यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी ९ एप्रिलपासून देशभर हिंसक निदर्शने होत आहेत. देशात औषधे, इंधन आणि विजेचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राजपक्षे सरकारविरुद्ध तीव्र रोष आहे. मात्र अध्यक्ष आणि पंतप्रधान राजपक्षे बंधूंनी राजीनामा देण्याचे टाळले होते. या दोघांनीही जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले होते. मात्र म्याना गो गामा आणि गोता गो गामा या भागांत सरकारसमर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये हिंसाचार उसळला़ त्यात १३० जण जखमी झाले. त्यानंतर येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी केली होती.




श्रीलंकेत ठिकठिकाणांहून हिंसेच्या घटनांची माहिती समोर येत आहे. आंदोलकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि इतर नेत्यांच्या घरांना पेटवून दिलं आहे. महिंदा राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलकांनी घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या खासदाराचा आंदोलकांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. तर, 150 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळं श्रींलकेत अंतर्गत गृहयुद्ध सदृश्य परीस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.



श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोलंबेमध्ये सैन्याला तैनात करण्यात आलं आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना आणि सरकार समर्थकांना दूर कर ताना दिसून आले. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या देखील फोडल्या. सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाल्याचं दिसून आलं आहे. महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य सनथ निशांत यांचं घर पेटवून देण्यात आलं आहे. महिंदूा राजपक्षे यांच्यासह माजी मंत्री निमल लांझा, समनलाल फर्नाडो, महिंदूा कहांदागामगे, अरुंदिका फर्नाडो, खासदार सनथ निशांत, माजी मंत्री जॉन्सन फर्नाडो यांच्यासह अनेक मंत्री, खासदारांची निवासस्थाने जाळण्यात आली़ निदर्शकांनी राजपक्षे कुटुंबीय आणि त्यांच्या निष्ठावंतांना लक्ष्य केल्याचे चित्र आह़े




महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी आंदोलकांचा विरोध करण्यासाठी ग्रामीण भागातून लोक आणले होते. महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी 3 हजार लोकांना संबोधित केलं. राष्ट्रहितासाठी राष्ट्राचं संरक्षण करणार असं महिंदा राजपक्षे म्हणाले. यानंतर राजपक्षे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी आंदोलकांचा तंबू उखडून टाकला, यानंतर दोन्ही गट भिडले असल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली आहे.


Updated : 10 May 2022 8:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top