तिकडे गेलात काय मिळालं ? बाबाजीका ठुल्लू ! :आदित्य ठाकरे
X
गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे , आणि त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामं करतो , खरं बोलतो , आणि कोण खोटं बोलतो ते अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर गटावर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे . जळगाव मधील पाचोऱ्यात आज आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेशी शिव संवाद साधला . भर पावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती . यावेळी आदित्य ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना 'महाराष्ट्रात कट रचलाय शिवसेनेला संपवण्याचा , आम्हाला एकटे पडण्याचा . तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का ?' असा प्रश्न जळगावकरांना करताचा उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांनी घोषणा देत आपला पाठिंबा कायम सोबत असल्याचं दाखवून दिलं .
पाचोऱ्यातील सभेत बोलताना 'महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे . त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी झाली . आणि गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे , आणि त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामं करतं , खरं बोलतं , आणि कोण खोटं बोलतं ते . देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे , सत्तामेव जयतेला नाही . त्यामुळे हे गद्दारांचं हे बेकायदेशीर सरकार लवकरचं कोसळणार म्हणजे कोसळणार' असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .
हिंदुहृदयसम्राटांचे त्यांच्यात विचार असते, तर आसाम मध्ये पूर आला तिथे मदत करायला गेले असते . पण मजा मारत बसले नसते. प्रत्येक गद्दाराच्या मतदार संघात जाऊन गदाराबद्दल सांगणार म्हणजे सांगणार असेही आदित्य ठाकरे म्हणाला.
'सरकार गेल्याच दुःख नाही , ते परत आणाल तुम्ही . पण प्रगतिशील महाराष्ट्र रोखण्याच काम यांनी केलं . कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याच काम उद्धव साहेबांनी केलं , याचं जगाने कौतुक केलं .महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणून त्यांच्या पोटात दुखत असेल . कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे . देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं . बंड करायला हिम्मत लागते, यांनी गद्दारी केली . गुवाहातीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं . गुवाहातील गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते, मजा करत होते, पण तिथला पूर त्यांना नाही दिसला.
हिंदुत्वासाठी गेले नाही, एक दोन लोकांच्या स्वरथासाठी गेले . हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या सुपुत्राने राजीनामा दिला , तेव्हा टेबलावर चढून बार मधे नाचतात तसे हातवारे करत नाचत होते . उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा या 40 जणांनी काम करण्या ऐवजी आपलं सरकार उभारायची स्वप्न पाहिली , कोणी आपल्या आई वडील वा गुरू बाबत असे करेल का ? स्वतःला खोके कसे मिळतील ? स्वतःच ओके कसं होईल ते पाहत होते हे ..पहिली गद्दारांनी बॅच गेली , त्या पैकी किती जणांना मंत्री पद मिळाले ? आपल्याकडे याना चांगलं पद दिली होती , तिकडे जाऊन काय मिळालं ? हीच त्यांची लायकी होती, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली आहे.