Home > Max Political > संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला लोकसभेत यश मिळणार नाही- मल्लिकार्जून खरगे

संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला लोकसभेत यश मिळणार नाही- मल्लिकार्जून खरगे

संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला लोकसभेत यश मिळणार नाही- मल्लिकार्जून खरगे
X

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात केलेल्या एका सर्वेक्षणात भाजपला २०० पेक्षाही कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनी केला आहे. अशातच कर्नाटकमध्ये भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याने त्यांना लोकसभेत यश मिळणार नाही, असा दावा प्रियांक खरगे यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाने मध्यप्रदेश, गोवा, दादरा नगरहवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये तीन जागा मध्यप्रदेशात, दोन जागा गोव्यामध्ये तर दादरामध्ये एका उमेदवराचे नाव जाहीर करण्यात आले. देशभरात आतापर्यंत पक्षाकडून २४० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने मध्यप्रदेशामध्ये ग्वाल्हेरचे माजी आमदार प्रवीण पाठक, मुरैना मतदारसंघात माजी आमदार सत्यपालसिंह सिकरवार, व खंडवा येथून नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या राज्यात २९ जागांपैकी २८ जागेंवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. राहिलेल्या एका उमेदवाराचे नावही लवकरच जाहीर करण्यात येईल, असं पक्षाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आहे.

Updated : 7 April 2024 10:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top