"भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी देवेंद्र फडवणवीस यांचा जबाब नोंदवा"
X
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा. अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी विशेष न्यायालयात केली आहे.
तसेच भोसरी भूखंड भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आता 8 मार्च रोजी याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ खडसेंची 'ईडी'कडून चौकशी...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची चौकशी सुरू आहे.