खडसेंचं स्वजिल्ह्यात राष्ट्रवादीच्या गटबाजीने स्वागत
X
एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीत मोठं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, खडसेंचा स्वजिल्हा असलेल्या जळगावमध्ये त्यांना राष्ट्रवादीच्या गटबाजीला सामोरं जावं लागलं. खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यलयाच्या दरवाज्याजवळच युवा राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, खडसे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये न जाताच मुक्ताईनगर कडे रवाना झाले.
विशेष बाब म्हणजे खडसेंच्या स्वागतासाठी एकही वरिष्ठ नेता माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आजी माजी कोणतेही आमदार उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील ही देखील अनुपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना खडसे स्वागतच आमंत्रण नव्हतं अस बोललं जातंय. खडसेंसारखा मोठा नेता राष्ट्रवादीत आल्याने सर्वांना एकत्र करून जंगी स्वागत करता आले असते. मात्र, पक्षात नवीन कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना विश्वासात घेतले नाही. परस्पर कार्यक्रम घेतला असं नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली .
युवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खडसे स्वागताचा कार्यक्रम केला होता, सर्व वरिष्ठ नेते बाहेर गावी गेल्याने आले नाहीत. राष्ट्रवादीत गट बाजी नाही असं महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं.
खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर मुक्ताईनगर कडे परत असताना ठाणे, नाशिक, जळगाव येथे त्यांचं राष्ट्रवादीच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, खडसेंचा गड असलेल्या स्वत:च्या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच स्वागत झालं. मात्र, तेही गटबाजीने, आता एकनाथ खडसे पुढील काळात या गटबाजी ला कसं सामोरं जातात? भाजप मधील शिस्त राष्ट्रवादीत लावतील का? हे कळण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.