महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त आमदार दिल्लीत…
महाराष्ट्र विधीमंडळाच्या आमदारांसाठी ५ आणि ६ एप्रिल २०२२ रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांना अमरत्व आलेल्या पानिपत येथील स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्या च्यादृष्टीने स्मारकाला भेट देणार असल्याचेही गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
X

महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ एप्रिल २०२२ ला संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण ११० आमदारांनी नोंदणी केली असून आमदारां ची चांगली उपस्थिती राहील असं मत निलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकैय्या नायडू लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पानिपत स्मारकाच्या व्यवस्थेबाबत स्थानिक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर अनुयायांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेतही समर्थपणे परकीय सत्तांचा सामना करत देश रक्षणाचे कार्य केले. देश रक्षणासाठी पानिपत येथे धारातिर्थी पडलेल्या या शुरांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या पानिपत स्मारकाला भेट देवून या स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्यासाठी स्थानिक मराठी संघटना, जिल्हाधिकारी व महानगर पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत स्थानिक शिवप्रेमींची मागणी आहे. यासंदर्भात रोड मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबतही चर्चा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कर्नाल आणि कुरुक्षेत्र येथेही भेटीचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.