Home > News Update > संडेब्लॉक; हे आहे लोकलचे टाईमटेबल?

संडेब्लॉक; हे आहे लोकलचे टाईमटेबल?

संडेब्लॉक; हे आहे लोकलचे टाईमटेबल?
X

मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गांवर आज (रविवारी) विविध तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.त्यामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावतील. मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक काळात डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकातून पुन्हा डाऊन जलद मार्गावर या लोकल वळवण्यात येणार आहेत. परिणामी जलद मार्गावरील लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. पश्चिम मार्गावर ब्लॉक काळात अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

लोकल झळा

माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग-रविवार. स.१०.३० ते दु.३.००

हार्बर मार्ग: सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर रविवार. अप मार्ग-११.१० ते दु.३.४० वा. आणि डाऊन मार्ग-स.११.४० ते दु.४.१० वा.

पश्चिम रेल्वे : बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्ग कधी: रविवार. स.१०.३५ ते दु.३.३५ वा.

Updated : 23 Jun 2019 10:58 AM IST
Next Story
Share it
Top