रामदेव बाबा की जय हो
X
कुठल्याही उघड्या-नागड्या मॉडेल्सचा आधार न घेता ब्रँड रामदेव बाबा च्या जीवावर पतंजली हा ब्रँड घराघरात पोहचवलाय. रामदेव बाबांची झेप मोठी असली तरी सध्यातरी पार्ले हाच भारतातील सर्वांत मोठा ब्रँड ठरलाय. अमूल, क्लिनिक प्लस ब्रिटानिया यांनी ही टॉप १० ब्रँड मध्ये स्वत:चं स्थान पक्कं ठेवलंय. घडी, व्हिल आणि कोलगेट ला मात्र सर्वाधिक फटका बसलाय. त्यांचं मार्केट पेनिट्रेशन कमी झालंय.
रामदेव बाबाच्या पतंजलीचं मार्केट पेनिट्रेशन २०१६ मधल्या २७.२ टक्क्यांवरून २०१७ मध्ये ४५.४ टक्के पोहोचलंय. ब्रँड फूटप्रिंट च्या रिपोर्ट नुसार कंपनीचं मानांकन ३० वरून २४ वर पोहोचलंय. पार्लेचं सीआरपी म्हणजे कस्टमर रिचींग पॉइंट ४६२३ आहे तर पतंजलीचं सीआरपी ७९३ आहे. पार्लेचं पेनिट्रेशन ७१.९ टक्के आहे.
पतंजलीच्या इतर प्रॉडक्टस सोबतच आता हँडवॉश आणि टूथपेस्ट जास्त विकली जातायत. योगगुरू बरोबरच रामदेव बाबा आता सक्सेसफुल ब्रँड मॅनेजर म्हणूनही ओळखले जाऊ लागलेयत.