निवडणूकांमध्ये मोठा पराभव दिसल्यामुळे मोदी सरकार बिथरलं जीएसटीच्या मर्यादेत वाढ, छोट्या उद्योजकांना दिलासा
X
तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर लोकसभेतही मोदींना मोठा फटका बसणार असल्याचं सध्या चित्र आहे. लोकांमध्ये नोटाबंदी आणि जीएसटी संदर्भात असलेल्या रोषामुळे आता मोदी सरकारने डॅमेज कंट्रोल ला सुरूवात केली असून छोट्या उद्योजकांना दिलासा देत जीएसटीची मर्यादा ४० लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी ही मर्यादा २० लाख होती.
४० लाखांपर्यंत उलाढाल असलेल्यांना आता जीएसटी भरावा लागणार नाही. या निर्णयामुळे जीएसटी भरणाऱ्या ६० टक्के छोट्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे.
जर ६० टक्के उद्योग जीएसटीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागत असेल तर यातून सरकारचं आर्थिक अनियोजनाचं समोर आलंय अशी प्रतिक्रीया आर्थिक विषयाच्या जाणकार पत्रकार सुचेता दलाल यांनी दिली आहे. यापूर्वी राहूल गांधी यांनी जीएसटी ला गब्बर सिंह टॅक्स असं म्हटलं होतं. जीएसटी मुळेच गुजरात मध्ये भाजपाला यंदा मोठा फटका बसला होता. सरकार छोट्या व्यापाऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप ही काँग्रेसने केला होता.