कोव्हीड योद्धा आशा वर्कर्सना ८ महिन्यांचे वेतन नाही
कोरोना काळात आरोग्यदूत म्हणून ज्यांचा गौरव केला गेला त्या आशा वर्कर्सच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा रिपोर्ट....
X
कोरोना संकटाच्या काळात डॉक्टरांसह हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि त्याचबरोबर सफाई कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशी व मामा हे सर्व कोरोना योद्धा म्हणून पुढे आले. त्यांच्या प्रती लोकांचा आदर आणखी वाढला. याच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मैदानात उतरुन जीव धोक्यात घलात काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्य समस्यांकडे मात्र अजूनही दुर्लक्ष होते आहेत. उल्हानगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेले 8 महिने या महिलांना पगार मिळालेला नाही. इतकेच काय कोरोना काळात या महिला जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना 300 रुपये रोज कोरोना काळात द्यावा असे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून तसा ठराव मंजूर होऊन देखील झाला आहे. पण अद्याप या महिलांच्या हातात छदाम पडलेला नाही अशा अतिशय हालाखीची परिस्थितीत या महिला काम करीत आहेत.
८ महिन्यांपासून पगार नाही
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात 100 आशा वर्कर आहेत. त्यांना दिवसाला 25 घरांचे सर्वेक्षण करावे लागते आणि हे करण्यास गेले असता लोक त्याना माहिती देत नाहीत, "तुम अंदर मत आओ, तू कोरोना लाओगे असे बोलून त्याना अक्षरश: हाकलून दिले जाते.
हाय रिस्क झोनमध्ये डॉक्टर नर्सपेक्षा हया आशा वर्कर्स काम करतात. एखाद्या वस्तीत कोरोना रुग्ण सापडल्यास त्याला रुग्णालयात पाठवणे, आजुबाजुच्या लोकाना टेस्ट करण्यास आग्रह करणे, अशी कामे त्या करत असतात. मात्र लोक काही टेस्ट करायला येत नाही. "आम्ही टेस्ट नाही करणार आम्हाला काही नाही झाले, तुम्ही टेस्ट करायला न्याल आणि खोटा पॉजिटिव रिपोर्ट देवून आमच्या जीवावर पैसे कमवाल" असा आरोप करुन या आशा वर्कर महिलांना लोक हाकलुन लावतात.
यापेक्षा आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलांना हे काम करण्यासाठी फक्त 33 ( तेहतिस रुपये) रुपे दिवसाला मिळतात. महिन्याचे 1000 रुपये. रोज 3 ते 5 तास काम करण्याचा हा मोबदला मिळतो. कोरोना योद्धा म्हणून ज्यांच्या गौरव केला जातो त्या आशा वर्कर्सबाबतचे हे धोरण नक्कीच योग्य नाही. यासंदर्भात महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रभाग समितीच्या सभापती अंजली साळवे यांनी केला आहे.