महिला सरसवल्या पेरणीसाठी
मजुरांचा तुटवडा, मजुरीचे दर वाढले; शेतकऱ्यांचे कुटुंब स्वतःच करत आहेत पेरणी
X
आधीच अवकाळी मुळे पिकांचे झालेली नुकसान व घरात पडून असलेल्या कपसामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात पावसाच्या आगमनाने खरीपाच्या पेरणींना वेग आला असताना दुसरीकडे आता त्यातच मजुरांचा तुटवडा असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. मजुरीचे दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब स्वतः पेरणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा हा काहीसा सुखावला आहे. मात्र पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना व इतर शेती कामांना वेग आला असून त्यामुळे मजुरांचा मात्र मोठा तुटवडा निर्माण झाल्याने मजुरीचे दर हे दुपटीने वाढले आहे. आधीच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान, भाव मिळत नसल्याने घरात पडून असलेला कापूस यामुळे बळीराजा हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे, असे शेतकरी महिला अभिलाषा रोकडे म्हणाल्या.पेरण्यासाठी मजुरीचे दर परवडत नसल्याने आता शेतकऱ्यांचे कुटुंब स्वतः पेरणीसह शेतीचे कामे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक विवंचनेतून सावरण्यासाठी शेतकरी महिलांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.