Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांचा पैसा विधानसभेला उधळणार का? राजू शेट्टी

शेतकऱ्यांचा पैसा विधानसभेला उधळणार का? राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न देता हाच पैसा आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारणी उधळतील अशी भिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचा पैसा विधानसभेला उधळणार का? राजू शेट्टी
X

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी बैठक पार पडली. यंदाच्या साखर हंगामावर ही बैठक पार पडली.यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे.जागतिक बाजारपेठत साखरसाठा कमी असूनसरकारने घाई गडबडीने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली.2021-22 ची 300 रुपयेची देय अजून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

यंदा शेतकऱ्यांना अंतिम बिलाला 400 रुपये मिळाले पाहिजे.हंगाम सुरु होईपर्यंत सर्व कारखान्यानी डिजिटल वजन काटे बसवले पाहिजेत.दसऱ्यापर्यंत ही शिल्लक देय द्यावी, अन्यथा हंगाम सुरु करू देणार नाही.यासर्व मागण्यांसाठी 13 सप्टेंबर रोजी प्रादेशिक साखर कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.रासायनिक खतांच्या किंमती 22 टक्क्यानी वाढत असेल तर आम्ही जास्त दर का मागू नये? सरकारने खताच्या किंमतीवर नियंत्रण का ठेवले नाही?आता शेतकऱ्यांना न दिलेले पैसे विधानसभेला उधळले जाणार.

जर शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर कारखानदारांना ठेवणार नाही.

- भाजपच्या साखर कारखानदारकडून अजित पवारांनी हमी पत्र का मागू नयेत? कारखाना काढताना भरमसाठ कर्ज उचलली जातात, पण ती विकताना कवडीमोल भावाला विकतात, असे राजू शेट्टी शेवटी म्हणाले.

Updated : 25 Aug 2023 12:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top