ग्राऊंड रिपोर्ट : दिल्ली आंदोलनातून गोदी मीडिया बूम गायब
दिल्लीतील शेतकरी आंदोलन राष्ट्रव्यापी झाले असतानाच या आंदोलनात आणखी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवत आहे ती म्हणजे गोदी मीडियाला चाप लावण्यात आला आहे. वाचा आमते प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.....
X
सध्या दिल्ली येथे शेतक-याचं नवीन कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व माध्यमं या ठिकाणी या आंदोलनाची कव्हरेज करण्यासाठी पोहोचली आहेत. मात्र, या माध्यमांमधील गोदी मीडिया अशी ओळख असलेल्या काही माध्यमांना मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या रोशाला सामोरं जावं लागत आहे. मीडिया कव्हरेज करत असताना या माध्यमांच्या प्रतिनिधींना शेतकरी Godi Media Go Back असे नारा लावत पिटाळून लावत आहेत.
हमारी गलत खबरे दिखाते हो...
दो महिने कहा थे?
हम खलिस्तानी है क्या?
तुम्हारा संपादक कहा है?
असे सवाल या प्रतिनिधींना विचारले जात आहे. त्यामुळे या पत्रकारांना शेतक-यांच्या प्रश्नांची उत्तर देताना मोठी अडचण येत आहे. त्यातच शेतक-याच्या निवासाच्या ठिकाणी जाउन रिपोर्टिंग करताना तर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
त्यामुळे आता यावर उपाय म्हणून या माध्यमांनी आपल्या चॅनलची ओळख असणारा बूमच गायब केला आहे. आता या माध्यमांमधील पत्रकार थेट
शेतक-यांमध्ये जाऊन रिपोर्टिंग करताना बूम न वापरता लेपल माइकचा वापर करताना दिसत आहेत. किंवा थेट शेतक-यांमधून रिपोर्टिग करण्याचे टाळत आहेत. शेतकरी किसान आंदोलनामध्ये गोदी मीडियाला मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरं जावं लागत आहे.