Home > मॅक्स किसान > विदर्भात नेमका पाऊस कधी पोहोचणार?

विदर्भात नेमका पाऊस कधी पोहोचणार?

विदर्भात 22 जून ते 1जुलै पर्यंत पावसाचे प्रमाण जास्त राहणार- हवामान तज्ज्ञ अनिल बंड

विदर्भात नेमका पाऊस कधी पोहोचणार?
X

पांढरं सोनं आणि सोयाबीनचा आगार असलेला विदर्भ मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून अद्यापही कोकणात तळ ठोकून आहे उर्वरित महाराष्ट्र सह मराठवाडा आणि विदर्भात त्याचे आगमन कधी होणार याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.पाऊस नसल्याने अमरावती जिल्ह्यात एकही टक्के पेरण्या झाल्या नाहीत, तर 22 जून ते 1 जुलै पर्यंत विदर्भात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती तयार ठेवावी व जुनच्या अगदी शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

Updated : 19 Jun 2023 7:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top