Home > मॅक्स किसान > अवकाळी पावसाने उडवले होळीचे रंग, शेतकऱ्यांना मोठा फटका

अवकाळी पावसाने उडवले होळीचे रंग, शेतकऱ्यांना मोठा फटका

फेब्रुवारी महिना प्रचंड तापदायक ठरला असतानाच होळीच्या दिवशी अवकाळी पावसाने होळीचे रंग उडवल्याचे पहायला मिळाले.

अवकाळी पावसाने उडवले होळीचे रंग, शेतकऱ्यांना मोठा फटका
X

फेब्रुवारी (Hot February 2023) महिना गेल्या 100 वर्षात प्रचंड तापदायक ठरला आहे. त्यामुळे मार्च (March 2023) महिनाही तापणार का? अशी शक्यता वर्तवली जात असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, धान आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी दिली.

मुंबईतही अवकाळीच्या धारा (Mumbai Rain)

होळीच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेकांनी होळी सण उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र अवकाळी पावसाने होळीच्या रंगावर पाणी पडले. त्यातच अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे यांमुळे मुंबईत धूळ पसरल्याची पहायला मिळाली. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना जरा दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पावसाने झाडांच्या फांद्या, पाने रस्तयावर पडले आहेत. त्यामुळे ही दृष्य मुंबईकरांनी कॅमेऱ्यात कैद केले आहेत. तसेच ट्वीट करून मुंबई वेदर अँड मुंबई रेन असा ट्रेंड सध्या ट्विटरवर पहायला मिळत आहे.

Updated : 7 March 2023 9:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top