#Wheat तुर्कस्थानने भारताचा गहू का नाकारला?
X
#रशिया आणि युक्रेन (russia vs ukrain) यांच्यात युद्धानं जगातील अर्थकारण बिघडले आहे. गव्हाचे (wheat) सर्वाधिक उत्पादक असलेले रशिया आणि युक्रेन युध्दात अडकल्यानं दोन्ही देश संपूर्ण जगात गहू निर्यात खोळंबली आहे. युद्धाचा परिणाम गव्हाच्या निर्यातीवर झाला होता. त्यामुळे अनेक देशांमध्ये गव्हाची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जगाला भारताकडून गव्हाची अपेक्षा होती. मात्र देशांतर्गत भाववाढीमुळे भारतानं गहू निर्यात (export) रोखली आहे.
भारताकडून निर्यात झालेल्या गव्हात रुबेला व्हायरस (rubela virus) आढळून आल्याचं तुर्कस्तानच्या कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. २९ मे रोजी तुर्कस्ताननं भारताकडून पाठवण्यात आलेला गहू परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाईट्सच्या अहवालानुसार, तुर्कस्तानचं जहाज ५६,८७७ टन गहू घेऊन मायदेशी परतलं असून आता हे जहाज तुर्कस्तानहून गुजरातच्या कांडला बंदरात (kandala port) पोहचलं आहे.
भारताच्या गव्हात रुबेला व्हायरस सापडल्याची माहिती इस्तंबूलमधील एका व्यापाऱ्यानं दिली. त्यामुळेच तुर्कस्तानच्या कृषि मंत्रालयानं गव्हाचा साठा घेण्यास नकार दिला. गहू घेऊन आलेलं जहाज जूनच्या मध्यापर्यंत कांडला बंदरात पोहोचेल, असं व्यापाऱ्यानं सांगितलं.
रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हे बऱ्याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दर्शवते. यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा (rubella virus) संसर्ग ३-५ दिवस टिकू शकतो आणि जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकलतो, शिंकते किंवा नाक आणि घशातून स्त्राव होतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.
संपूर्ण जगात गव्हाची टंचाई निर्माण झाली असताना तुर्कस्ताननं भारतानं दिलेला गहू परत करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेन, रशियाकडून होणारी निर्यात कमी झाल्यानं जगभरातील देश पर्याय शोधत आहेत. मोदी सरकारनं गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही जवळपास १२ देशांनी भारताकडे मदत मागितली आहे. निर्यात रोखल्यानंतरही भारतानं इजिप्तला ६० हजार टन गहू पाठवला. इजिप्तमध्ये अन्नधान्याची प्रचंड टंचाई आहे. लोकांचा भूकबळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे भारतानं इजिप्तला गहू पाठवला आहे.तुर्कीच्या या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना त्रास होऊ शकतो. कारण येत्या काही दिवसांत भारतीय गव्हाची शिपमेंट इजिप्तसह विविध देशांमध्ये जाणार आहे. भारतीय गहू नाकारल्याने इतर देशांकडून त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात.