तूरडाळ अधिक महागणार
X
भारतात दिवंसेदिवस महागाई वाढतच चालीय. देशातील सामान्य लोकांना माहागाई, बेरोजगारीचा मोठ्याप्रमाणात सामना करावा लागत आहे. दैनंदिन जीवनात वापरलेल्या जाणाऱ्या घरगुती गोष्टींचा दर उंची गाठत आहे. अशातच भाज्यांबरोबर तूरडाळीचे भाव सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
तूरडाळ भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचे धान्य आहे. भारत डाळींचे सर्वाधिक सेवन करणारा देश आहे. तूरीच्या डाळीची किंमत १३५ रुपयांहुन प्रति किलोवर गेली आहे. सध्या तूरीची डाळ खूप महाग झाली आहे. कांदा व टोमॅटोचे भाव सुद्धा १०० रुपयांवर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. या गोष्टीमुळे सर्वसामान्य माणसाच मरण झालय. अनियमित पावसामुळे पीक मोठ्या प्रमाणात खराब होऊन तूरीची डाळ उत्पादनात घट झाली आहे. यावेळी तूरडाळ उत्पादनात जवळपास २५ टक्क्यांची घट आहे. २०२२ मध्ये तूरडाळ घाऊक बाजारात भाव ९० रुपये किलोपर्यंत होते. मे ते नोव्हेबंरमध्ये तूरडाळीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मार्चमध्ये दर १०५ रुपये व एप्रिलमध्ये ११२ रुपये किलोपर्यंत गेले. आता काही ठिकाणी १३५ ते १४० रुपयांपर्यंत तूरडाळीचे भाव गेले आहे व हे भाव २०० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.