Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांना गंडा घालणारे व्यापारी अखेर जेरबंद

शेतकऱ्यांना गंडा घालणारे व्यापारी अखेर जेरबंद

शेतकऱ्यांना गंडा घालणारे व्यापारी अखेर जेरबंद
X

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक करणारे ३ जण पोलिसांच्या ताब्यात

आले आहेत. निफाड तालुक्यातील सुकेणा, उगाव परिसरात द्राक्ष व्यापाऱ्यांचे पायलट बनून असंख्य द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना न्याय दिला जात असून, यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप बसणार आहे. त्यानंतर संशयित आरोपींना पिंपळगाव बाजार समितीत नेऊन शेतकऱ्यांना ओळख करून दिली. भविष्यात अशा व्यापाऱ्यांशी कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले.


Updated : 29 Aug 2023 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top