टोमॅटोचे गणित बिघडले
येवल्यात टोमॅटोच्या कॅरेटला ५०० ते ५५० रुपये भाव
X
सर्वच बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोच्या बाजारभावात घसरण होत आहे. तरी या टोमॅटो खरेदी करता बेंगलोरसह इतर राज्यातील व्यापारी अजून दाखल झाले नसल्याने हे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी दाखल झाल्यास नक्कीच टोमॅटोचे भावात सुधारणा होईल असे टोमॅटो व्यापारी सांगत असून सरकारने टोमॅटोच्या बाजारभावात लक्ष घालून सुधारणा करावी अशी मागणी देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे.
येवला बाजार समितीत टोमॅटो येण्यास सुरुवात झाली असून २० किलोच्या एका कॅरेटला ५०० ते ५५० रुपये सरासरी भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची आवक वाढत असल्याने टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. सातत्याने टोमॅटोच्या भावात घसरण होत असून नक्कीच सरकारने याकडे लक्ष देऊन टोमॅटो बाजारभावातील आयात-निर्यात धोरण निश्चित करावे जेणेकरून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल. टोमॅटोचे भाव असेच कोसळत राहिल्यास नक्कीच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होणार असल्याने टोमॅटोच्या बाजार भाव सुधारणा व्हावी याकरता सरकारने याकडे लक्ष घालावे अशी मागणी देखील टोमॅटो उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. टोमॅटो उत्पादक अनिल जठार आणि टोमॅटो व्यापारी दत्ता निकम यांनी दिलेली माहिती