Home > मॅक्स किसान > राज्यात टोमॅटोच्या भाववाढीचं संकट कायम राहणार?

राज्यात टोमॅटोच्या भाववाढीचं संकट कायम राहणार?

राज्यात टोमॅटोच्या भाववाढीचं संकट कायम राहणार?
X

देशभरातील बाजारापेठत टोमॅटो दराने अधिक उंची गाठली आहे. टोमॅटोचा दर हा प्रति किलो २५० ते ३०० रुपयांवर पोहोचला आहे. अतिरेकी दरवाढीमुळे टोमॅटो भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.

देशात टोमॅटोला प्रचंड मागणी असतानाही अपेक्षित टोमॅटो लागवड होताना दिसत नाही. खरीप हंगामात सरासरी ४० हजार हेक्टर क्षेत्र असताना यंदा जुलै अखेरपर्यंत २१ हजार हेक्टरवरच लागवड झाली आहे. दरवर्षी पेक्षा ५० टक्के टोमॅटोचे उत्पन घटनार आहे. त्यामुळे भविष्यातील टोमॅटोच्या उत्पादनावर अनिश्चितता निर्माण झाली आहे.

यावर्षी टोमॅटोची ५० टक्केच लागवड

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप हंगामात सरासरी ४० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड होते. यंदा जुलैअखेर २१ हजार ५८१ हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड सरासरीच्या पन्नास टक्केच आहे. राज्याचा कृषी विभाग सातत्याने टोमॅटो लागवडीचा आढावा घेत आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी रोपवाटिका चालकांना टोमॅटोची रोपे मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पण, प्रत्यक्षात रोपवाटिकांमधील रोपांना अपेक्षित मागणीच नसल्याचे समोर आले आहे.

टोमॅटो रोपांची आगाऊ नोंदणी होताना दिसत नाही

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे म्हणाले, कृषी विभागाच्या वतीने टोमॅटो रोपांची उपलब्धता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण, शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात टोमॅटो रोपांची आगाऊ नोंदणी होताना दिसत नाही. दरवर्षीच्या तुलनेत जेमतेम ५० ते ५५ टक्केच मागणी आहे. पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. विहीर, कुपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. टोमॅटो लागवड करून हंगामभर पाणी पुरेल की नाही, या विषयी शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे अगदी नारायणगाव, नाशिक पट्ट्यातही अपेक्षित टोमॅटो लागवड होताना दिसत नाही. पुरेशा पावसाअभावी टोमॅटो लागवड संथ गतीने होत आहे.

विभागनिहाय झालेली टोमॅटो लागवड (हेक्टर)

नाशिक – ११,१२३

पुणे – ३,९७८

लातूर – २,६७६

छत्रपती संभाजीनगर – २,३७८

अमरावती – ६५०

कोल्हापूर – ४०४

नागपूर – २८३

एकूण लागवड – २१,५८१.१३ हेक्टर

Updated : 8 Aug 2023 12:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top