Home > मॅक्स किसान > टोमॅटो मातीमोल झाला...

टोमॅटो मातीमोल झाला...

शेतीत घातलेले पैसे खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घातले जनावराला टोमॅटो

टोमॅटो मातीमोल झाला...
X

काही महिन्यापूर्वी टोमॅटोचे(Tomato) भाव दोनशे रुपये किलोवर गेले होते. चांगला भाव मिळेल या आशा पोटी लातूर जिल्ह्यातील शिरसल या गावच्या शेतकऱ्यांनी दोन एकर टोमॅटोची लागवड केली. पण भाव उतरल्याने शेतातील टोमॅटो काढण्यासाठी परवडत नाही.आज त्या शेतकऱ्याला टोमॅटो जनावराला ( animal feed)घालण्याची वेळ आली आहे, आमचे प्रतिनिधी वैजनाथ कांबळे यांचा रिपोर्ट...

भाव चांगला असल्यामुळे ज्ञानेश्वर हांडे यांनी शेतामध्ये दोन एकर टोमॅटो लावले. त्या दोन एकरचा खर्च अडीच लाख रुपये आहे. त्यामध्ये टोमॅटोचे रोप आणणे मंचिंग बेगड, ड्रीप, वेळू, तार, व इतर खर्च झाला आहे. मी टोमॅटो लावताना एका कॅरेटचा भाव बाराशे ते तेराशे रुपये होता पण माझे शेतामध्ये टोमॅटो आल्यावर कॅरेटला 50 ते 60 रुपये इतका इतका भाव झाला आहे. आज रोजी भाव पडल्यामुळे शेतातून टोमॅटो काढणे हे सुद्धा परवडत नाही. तरी सरकारने आम्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे एवढीच विनंती शासनाकडे केली आहे .

Updated : 20 Oct 2023 6:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top