टोमॅटो कोंडी: शिवाजी आवटे
कृषी विभागाच्या शेतमाल उत्पादनाच्या आकडेवारी आणि विश्लेषण संस्थांच्या मोघम अंदाजामुळे शेतमाल बाजाराचा बट्ट्याबळ होऊन अंतिमतः शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं विश्लेषण कृषी विश्लेषक शिवाजी आवटे यांनी केलं आहे...
X
कृषी विभागाची शेतमाल उत्पादनाच्या आकडेवारी आणि विश्लेषण संस्थांच्या मोघम आकडेवारीमुळे शेतमाल बाजाराचा बट्ट्याबळ होऊन अंतिमतः शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं विश्लेषण कृषी विश्लेषक शिवाजी आवटे यांनी केलं आहे...
सध्या टोमॅटो बाजार भाव 5 रुपये किलो पेक्षा कमी झाले आहे.आज सगळीकडून शेतकऱ्यांना अक्कल शिकवणारे मेसेज ,VDO सातत्याने पडत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार संपूर्ण भारतात सप्टेंबर महिन्यात 9 लाख टन टोमॅटो आवक येण्याची शक्यता आहे. तर आक्टोंबर महिन्यात हीच आवकं 13 लाख टनांपर्यंत वाढवणार असल्याची अनधिकृत आकडेवारी बाहेर आली आहे.
एक वेळ आपण थोडासा यावर विश्वास ठेऊ.मात्र एक प्रश्न असाही पडतो की हेच जर शेतकऱ्यांना जून महिन्यात सांगितले असते की सप्टेंबर आक्टोंबर महिन्यात टोमॅटो चा गरजेपेक्षा जास्त पुरवठा होऊ शकतो. तर शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करताना निश्चित विचार केला असता. मे आणि सप्टेंबर महिने टोमॅटो साठी डेंजर झोनमध्ये असतील असे आपण डिसेंबर 2022 मध्येच सांगितले होते. जे संपर्कात होते ते पण विश्वास ठेवतं नव्हते.आज जेव्हा फेकून देण्याची वेळ आली तेव्हा काही गोष्टी पटायला लागल्या मात्र तो पर्यंत वेळ गेलेली आहे.सरकार कडे कोतवाल पासून कलेक्टर पर्यंत ची यंत्रणा हातात असताना प्रत्येक सहा महिन्यांत प्रत्येक पिकांच्या बाबतीत अशी वेळ येते ही बाब नक्कीच विचार करण्याची आहे.
आता सप्टेंबर महिन्यात 9 लाख टन आवकं असताना टोमॅटो भाव 2/3 रुपये किलो पर्यंत घसरले आहे तर आक्टोंबर महिन्यात 13 लाख टन आवकं झाली तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार न केलेलाच बरा.शेतकऱ्यांनी असल्या आकडेवारीच्या नादी लागून शेती चे नियोजन कसे करावे ?
क्रिसीलच्या नादी लागून सरकारने कांद्याची एवढी वाईट अवस्था केली आहे की आता शेतकरी कांदा लागवड करण्यासाठी किती उत्साह दाखवतील यावर प्रश्न चिन्ह आहे.
खरं तर शेतीमाल बाजार भावावर जेव्हा गरज आहे तेव्हा बोलणारे कुणीही दिसत नाही. टोमॅटो ची तेजी होती तेव्हा बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन येत होते.आता मात्र कुणालाही त्यांचं सोयरसुतक नाही. आक्टोंबर महिन्यात खरोखरच 13 लाख टन टोमॅटोची आवक होऊ शकते ? मला तरी तसं वाटत नाही आणि झालीच तरीही माझ्या मते 15 आक्टोंबर ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत भारतात टोमॅटो लागवड चे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे .Wait & Watch 🙏🏻
शिवाजी आवटे 23/9/2023